पत्नीचा खून, मुलीला मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: July 10, 2016 20:47 IST2016-07-10T20:47:48+5:302016-07-10T20:47:48+5:30

पतीने भर झोपेतच डोक्यात काठीने वार करुन पत्नीचा खून तर १५ वर्षीय मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील आर्वी येथे १० जुलै रोजी पहाटे घडली़

Wife's murder, attempt to kill the girl | पत्नीचा खून, मुलीला मारण्याचा प्रयत्न

पत्नीचा खून, मुलीला मारण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १० : पतीने भर झोपेतच डोक्यात काठीने वार करुन पत्नीचा खून तर १५ वर्षीय मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील आर्वी येथे १० जुलै रोजी पहाटे घडली़ याप्रकरणी सदाशिव शेंडगे नावाच्या पतीला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
सुरेखाबाई सदाशिव शेंडगे (वय ४०) असे मयत महिलेचे नाव आहे़ तिचे व पतीसदाशिव यांचे घरगुती कारणावरून नेहमी भांडण होत होते़ ९ रोजी दुपारी दोघांचे भांडण झाले़ या भांडणाच्या संतापातच १० रोजी पहाटे शेतातील घरात सदाशिव याने खाटेवर झोपलेल्या पत्नी सुरेखाबाईच्या डोक्यावर व शरीरावर काठीने जबर वार करून तिचा खून केला़
या सर्व प्रकार त्याची मुलगी प्रिती (वय १४) ही बघत होती़ तिलाही काठीने मारून तिचे डोके फोडले़ तसेच गळा दाबून तिला जिवे मारण्याच्या प्रयत्न केला़ याबाबत प्रिती हिने धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सदाशिवविरूध्द भादंवि कलम ३०२, ३०७, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Wife's murder, attempt to kill the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.