पत्नीच्या खुन्यास अटक

By Admin | Updated: July 4, 2016 03:49 IST2016-07-04T03:49:49+5:302016-07-04T03:49:49+5:30

एक वर्षापूर्वी अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून देणाऱ्या मारेकऱ्याला पालघर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण काल अटक केली.

Wife's murder is arrested | पत्नीच्या खुन्यास अटक

पत्नीच्या खुन्यास अटक


वसई : एक वर्षापूर्वी अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून देणाऱ्या मारेकऱ्याला पालघर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण काल अटक केली.
सुरेंद्रकुमार आल्हो साव (२८) असे मारेकऱ्याचे नाव असून तो भार्इंदर येथील रहिवासी आहे. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तिने लग्नासाठी आणि पैशांसाठी सुरेंद्रकुमारच्या मागे याच्याकडे लकडा लावला होता. तो विवाहित असून त्याला तीन मुले असल्याने लग्नासाठी त्याने नकार दिला होता.
मात्र, त्यावरून दोघांमध्ये वाद होत असत. तिच्या त्रासाला कंटाळून सुरेंद्रकुमारने तिचा काटा काढाचा निर्णय घेतला. २० मार्च २०१५ रोजी सुरेंद्रने फिरायच्या बहाण्याने तिला मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चिंंचोटी येथील एका निर्जनस्थळी आणून तिचा धारदार शस्त्राने गळा कापून आणि पोटावर वार करून हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो एका गोणीत भरून वाडा-उंबरोठे रस्त्यावर असलेल्या मोरीत टाकून दिला होता. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. वर्षभर खूनाचा उलगडा झाला नव्हता.
दरम्यान, खूनाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमने खूनाचा उलगडा करीत आरोपी सुरेंद्रकुमारला बेड्या ठोकल्या.
(प्रतिनिधी)

Web Title: Wife's murder is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.