दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा केला खून
By Admin | Updated: April 9, 2016 03:15 IST2016-04-09T03:15:19+5:302016-04-09T03:15:19+5:30
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीस एकाने कठोरा येथे गुढी पाडव्याला पहाटे डोक्यात कुदळ घालून खून केला. आरोपीला अटक केल्याशिवाय विवाहितेवर अंत्यसंस्कार न करण्याचा नसल्याचा पवित्रा घेतला

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा केला खून
जळगाव : दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीस एकाने कठोरा येथे गुढी पाडव्याला पहाटे डोक्यात कुदळ घालून खून केला. आरोपीला अटक केल्याशिवाय विवाहितेवर अंत्यसंस्कार न करण्याचा नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर नदीपात्रात लपलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
कठोरा येथे एका झोपडीत अंकुश सपकाळे (३९) हा पत्नी रत्नाबाई (३६) व मुलगा उमेशसह राहतो. अंकुशला दारुचे व्यसन आहे. रत्नाबाई हिला तो सतत मारहाण करायचा. गुरुवारी रात्रीही अंकुशने पत्नीशी वाद घातला. पहाटे तीन वाजता त्याने तिच्या डोक्यात कुदळीचा वार केला. गोधडीने पत्नीचे तोंड दाबले व तेथून पळ काढला. उमेशने आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्यांनी रत्नाबाईला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस गावात पोहचताच त्यांना सुमारे तीन हजारावर गावकऱ्यांनी घेराव घातला. आरोपीला अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)