चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By Admin | Updated: July 1, 2016 00:45 IST2016-07-01T00:45:25+5:302016-07-01T00:45:25+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी येथील घटना; खून करुन पती पोलीस स्ठेशनमध्ये दाखल.

Wife's blood on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

मोताळा (जि. बुलडाणा): चारित्र्याच्या संशयावरून शेतात निघण्याच्या तयारीत असलेल्या पत्नीचा दोरीने गळा आवळून पतीने खून केला. मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथे गुरुवारी सकाळी ८:३0 वाजता ही खळबळजनक घटना घडली. अलका रामेश्‍वर धोरण असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनुसार, रामेश्‍वर बळीराम धोरण (४१) हे बोराखेडी येथील स्वत:च्या घरामध्ये त्यांचा १५ वर्षीय मुलगा व पत्नी अलका (३५) हिच्यासह राहतात. आपल्या पत्नीचे दुसर्‍या कोणाशी तरी संबंध आहेत, असा त्यांना बर्‍याच दिवसापासून संशय होता. त्या संशयावरू न पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा. ३0 जून रोजी सकाळी ८:३0 वाजेच्या सुमारास शेतात जाण्याच्या विषयावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. या वादाने गंभीर रूप घेतले. रामेश्‍वर धोरण यांनी आपल्या पत्नीचा दोरीने गळफास देऊन तिचा खून केला. या दाम्पत्याला १५ वर्षांचा एक मुलगा असून, घटनेच्यावेळी तो शाळेत गेला होता. घटनेनंतर आरोपीने शेजारील महिलेला या कृत्याची कल्पना देऊन थेट बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले व पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी रामेश्‍वर बळीराम धोरण यांच्याविरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Wife's blood on character suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.