ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि.23 - पत्नी मुलांसह माहेरी राहायला गेली त्याचा राग येवून पतीने कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याची घटना नावली, ता.नवापूर येथे घडली.नावली येथील सखाराम रशमा नाईक याची पत्नी कन्सराबाई सखाराम नाईक (३५) ही रागात मुलाना घेऊन माहेरी निघून गेली. तिची वाट पाहून व तिला सांगूनही ती येत नसल्याचा राग आल्याने पती सखाराम नाईक याने नावली गावाच्या धरणाजवळ तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. कन्साराबाई हीच्या फिर्यादीवरून सखाराम नाईक याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेरी गेल्याच्या रागातून पत्नीवर कुऱ्हाडीने वार
By admin | Updated: September 23, 2016 21:46 IST