पत्नीच्या नावे पतीनेच टाकले फेसबुकवर अश्लील मजकूर

By Admin | Updated: May 9, 2014 22:22 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:22:03+5:30

फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावेत यासाठी पत्नीच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून त्यावर अश्लील मजकूर टाकणार्‍या पती, दिराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Wife names wife on Facebook | पत्नीच्या नावे पतीनेच टाकले फेसबुकवर अश्लील मजकूर

पत्नीच्या नावे पतीनेच टाकले फेसबुकवर अश्लील मजकूर

पुणे : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावेत यासाठी पत्नीच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून त्यावर अश्लील मजकूर टाकणार्‍या पती, दिराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १५ मे पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला.
पती भैरव शंकरलाल शर्मा (वय ३६), दीर महेंद्र शंकरलाल शर्मा (वय २७, दोघेही रा. संजयनगर, सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सासू सायरी शंकरलाल शर्मा व सासरे शंकरलाल शर्मा यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पत्नीने फिर्याद दिली आहे. भैरवशी लग्न झाल्यानंतर फिर्यादी या सांगली येथे नांदत होत्या. यावेळी सासरची मंडळी तिला स्वयंपाक येत नाही असे म्हणत त्रास द्यायचे. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावेत, यासाठी त्यांना शिवीगाळ, माराहण करत असत. उपाशी ठेवून तिचा छळ करत असत, तरीही त्यांनी माहेराहून पैसे आणले नाहीत. त्यामुळे भैरवने पत्नीचे फेसबुकवर बनावट खाते घडले व त्यावर अश्लील मजकूर टाकला. पती व दिराला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कोणत्या संगणक, लॅपटॉपवरून अकाऊंट उघडले ते जप्त करावयाचे आहे यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील सुप्रिया मोरे देसाई यांनी केली होती. न्यायालयाने ती ग्रा‘ धरली.

Web Title: Wife names wife on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.