पत्नीचा खून करणारा अल्पवयीन!

By Admin | Updated: November 14, 2015 03:45 IST2015-11-14T03:45:03+5:302015-11-14T03:45:03+5:30

जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घातल्याच्या रागातून पत्नीचा खून करणारा पती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली आहे.

Wife murderer minor! | पत्नीचा खून करणारा अल्पवयीन!

पत्नीचा खून करणारा अल्पवयीन!

पुणे : जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घातल्याच्या रागातून पत्नीचा खून करणारा पती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली आहे.
३० आॅक्टोबरला ही खुनाची घटना उघडकीस आली होती. अल्पवयीन आरोपीने त्याची पत्नी पूजा हिचा गुलटेकडी परिसरात राहत्या घरी खून केला होता. नंतर तो फरार झाला होता. पतीचे वय १७ वर्षे तर पत्नी पूजा १८ वर्षांची होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात गेले होते. पूजाचे अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय होता. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Wife murderer minor!