हुंड्यासाठी छळणा-या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची हत्या

By Admin | Updated: June 1, 2017 15:50 IST2017-06-01T15:50:24+5:302017-06-01T15:50:24+5:30

लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही यासाठी छळणा-या पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे.

Wife murdered for raping her husband | हुंड्यासाठी छळणा-या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची हत्या

हुंड्यासाठी छळणा-या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची हत्या

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 1 - लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नव-याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रोशनी तुशार शेंडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
 
भंडारा जिल्ह्यातील सिल्ली अंबाडी येथील रहिवासी असलेल्या रोशनीचा विवाह डिसेंबर २०१५ मध्ये तुषार विश्वेश्वरावर शेंडे (वय २८) याच्यासोबत झाला होता. तुषार केबल कनेक्शनचे व्यवसाय करतो.  वधुपित्याने लग्नाच्या वेळी रितीरिवाजाप्रमाणे सर्वकाही देणेघेणे केले. 
 
मात्र, लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नसल्याचे सांगत आरोपी तुषार रोशनीचा छळ करू लागला. माहेरून हुंडा आणावा म्हणून तो रोशनीला छळत होता. हा प्रकार रोशनीने आपल्या माहेरच्यांना सांगितला होता. 
 
मात्र, हळुहळू होईल सर्व बरे, असे सांगून माहेरच्यांनी तिची समजूत काढली होती. पण तसं काही झाले नाही.  तुषारकडून होणारा छळ वाढल्यामुळे कंटाळलेल्या रोशनीने घराजवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळून आल्यानं ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. 
 
रोशनीच्या नातेवाईकांनाही धमकी 
रोशनीच्या आत्महत्येची माहिती कळताच तिचे  नातेवाईक भंडा-याहून नागपुरात आले. रोशनीने तुषारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्यांनी आरोप केला. रोशनीचे वडील आनंदराव मुरलीधर पालांदुरकर यांनी तशी तक्रार तहसील ठाण्यात नोंदवली. 
 
आरोपी तुषारने रोशनीचा बळी घेतानाच आपल्याला, पत्नीला आणि मुलीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले. पालांदूरकर यांच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक  व्ही. एस. कडलग यांनी आरोपी तुषारविरूद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.  
 

Web Title: Wife murdered for raping her husband