जीन्स आणि टी शर्ट घातल्याने पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या

By Admin | Updated: November 1, 2015 12:51 IST2015-11-01T12:51:17+5:302015-11-01T12:51:33+5:30

पत्नी जीन्स आणि टी - शर्ट घालत असल्याच्या रागातून पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Wife murdered in jeans and T-shirt in Pune; | जीन्स आणि टी शर्ट घातल्याने पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या

जीन्स आणि टी शर्ट घातल्याने पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १ -  पत्नी जीन्स आणि टी - शर्ट घालत असल्याच्या रागातून पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह घरात टाकून पतीने घरातून पळ काढला असून घरातून दुर्गंधी आल्याने ही घटना उघड झाली. 

पुण्यातील इंदिरानगरमध्ये पूजा आणि  रणजीत निषाद हे दाम्पत्य राहत होते. पूजा नेहमी टी शर्ट आणि जीन्स घालत असल्याने रणजीत आणि तिच्यामध्ये वारंवार भांडण व्हायचे. मंगळवारी रणजित आणि पूजामध्ये वाद झाला होता. वादाच्या वेळीची पूजाने जीन्स व टी शर्ट घातले होते. बुधवारी सकाळी रणजित घरातून जात असताना स्थानिकांनी बघितले होते. यानंतर निषाद दाम्पत्याचे घर बंदच होते. मात्र तीन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागली व स्थानिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घर उघडले घरात पूजाचा मृतदेह आढळून आला. रणजित आणि पूजा हे मुळचे उत्तरप्रदेशचे असून पोलिस रणजितचा शोध घेत आहेत. 

Web Title: Wife murdered in jeans and T-shirt in Pune;