अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची हत्या
By Admin | Updated: July 12, 2016 20:07 IST2016-07-12T19:55:57+5:302016-07-12T20:07:24+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली

अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची हत्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. याप्रकरणी पती लखन देवकर (४०) ला हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे.
मुळचा नेपाळचा रहिवासी असलेला देवकर हा मुलुंड देवी दयाळ रोड परीसरातील गितांजली सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. सोसायटीतील रहिवाशांनी पार्वतीसोबत विवाह लावून दिला. लग्नाला १४ वर्षे होऊनही त्यांना मुल होत नव्हते. यामुळे दोघांमध्ये खटके उडायचे. त्यात पार्वतीचे अनैतिक प्रेम संबंधाच्या संशयामुळे या भांडणात आणखीन भर पडत होती. याच संशयातून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. याच रागातून देवकरने चाकूने पार्वतीच्या डोक्यावर घाव करत हत्या केली.
सोसायटीतील रहिवाशांकडून घटनेची मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येच्या गुन्हा दाखल करत लखनला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.