पत्नीला अश्लील फोन कॉल्स, पतीच गुन्हेगार
By Admin | Updated: August 8, 2016 16:29 IST2016-08-08T14:50:36+5:302016-08-08T16:29:29+5:30
पतीने पत्नीचा मोबाईल नंबर आणि अन्य माहिती एस्कॉर्ट म्हणजे सुरक्षा पुरवणा-या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे.

पत्नीला अश्लील फोन कॉल्स, पतीच गुन्हेगार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - पत्नीला मानसिक त्रास देण्यासाठी पतीने पत्नीचा मोबाईल नंबर आणि अन्य माहिती कॉलगर्ल्स पुरवणा-या वेबसाईटवर अपलोड केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीचे वय ३५ असून पेशाने तो सॉफ्टवेयर इंजिनीयर आहे.
राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधल्या कंपनीत तो नोकरी करतो. २२ जुलैला पीडित पत्नीने मोबाईल नंबर आणि अन्य माहिती वेबसाईटवर अपलोड केल्या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल केला. हा नंबर अपलोड केल्यानंतर महिलेला अश्लील संभाषणाचे फोन येऊ लागले. ही महिला देखील सॉफ्टवेयर कंपनीत नोकरी करते.
पोलिसांनी उपकरणाच्या आयपी अॅड्रेस वरुन शोध सुरु केला तेव्हा तक्रारदार महिलेने जो पत्ता दिला होता. त्याच पत्त्यावर आयपी अॅड्रेसचे लोकेशन होते. अधिक तपासात पतीने त्याच्या टॅबलेटवरुन महिलेचा मोबाईल नंबर आणि अन्य माहिती अपलोड केल्याचे कबूल केले.
पत्नी सतत भांडण करायची त्यामुळे मी वैतागलो होतो. तिला मानसिक त्रास देण्यासाठी म्हणून मी हे कृत्य केले असे पतीने सांगितले. हे जोडपे छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील आहे.