विधवा आईवर मुलानेच केला बलात्कार
By Admin | Updated: November 16, 2014 19:06 IST2014-11-16T19:05:20+5:302014-11-16T19:06:37+5:30
नालासोपारा येथे व्यसनाधीन तरुणाने नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणाने स्वतःवर चाकूने वार करुन घेतले.

विधवा आईवर मुलानेच केला बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
नालासोपारा, दि. १६ - पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे व्यसनाधीन तरुणाने नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणाने स्वतःवर चाकूने वार करुन घेतले.
नालासोपारा येथे भाड्याच्या खोलीत विधवा महिला व तिचा २१ वर्षाचा मुलगा असे दोघे जण राहत होते. या महिलेच्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन असून तो बेरोजगार होता. नशेच्या स्थितीत तो तरुण नेहमीच त्याच्या आईचा छळ करायचा. गुरुवारी संध्याकाळपासून संबंधीत मुलगा हा घरी परतला नव्हता. शुक्रवारी संध्याकाळी नशेच्या अवस्थेत तो घरी परतला. यानंतर त्याने स्वत:च्याच आईवर बलात्कार केला. पिडीतेने त्याला प्रतिकार केला असता तो आईला घरात कोंडून पळून गेला. सतर्क शेजा-यांनी या सर्व घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्या मुलाने स्वत:वर चाकूने वार करुन घेतले.
पोलिसांनी या नराधम तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.