भुयारी मार्गाचे रुंदीकरण

By Admin | Updated: July 20, 2015 01:23 IST2015-07-20T01:23:02+5:302015-07-20T01:23:02+5:30

येथील मालाड पूर्व कुरार व्हिलेज मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील दफ्तरी रोड-कुरार गाव जोडणारा मुख्य भुयारी रस्ता चिंचोळा आहे.

Widening of the subway | भुयारी मार्गाचे रुंदीकरण

भुयारी मार्गाचे रुंदीकरण

दिंडोशी : येथील मालाड पूर्व कुरार व्हिलेज मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील दफ्तरी रोड-कुरार गाव जोडणारा मुख्य भुयारी रस्ता चिंचोळा आहे. गेली अनेक वर्षे हा भुयारी रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिक सातत्याने करीत होते. एमएमआरडीए आता या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
या कामाचे अंदाजपत्रक आणि कामाचा आवाका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे काम एमएमआरडीएकडून हाती घेण्याबाबत नगरविकास विभागास विनंती केली होती. त्यानुसार आमदार सुनील प्रभू यांनी एमएमआरडीएचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष
भेटून निवेदनाद्वारे विनंती केली होती. या भुयारी मार्गाबाबत एमएमआरडीएच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Widening of the subway