शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:41 IST

Pramod Mahajan News: भाजपाचे एकेकाळचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती.तेव्हापासून आतापर्यंत प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत अनेक उलट सुटल दावे केले जातात. आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागचं कारण सांगताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

भाजपाचे एकेकाळचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती. महाजन कुटुंबामध्ये घडलेल्या या घटनेमुळे तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून आतापर्यंत प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत अनेक उलट सुटल दावे केले जातात. आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागचं कारण सांगताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करताना प्रकाश महाजन म्हणाले की, काही न करता सुखाला चलावलेला माणूसच असं करू शकतो. प्रमोद महाजन यांना त्रास देणं, ब्लॅकमेल करणं ही कामं प्रवीण महाजन हा करत होता. तो प्रमोद महाजन यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. तसेच ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालायचं ती व्यक्ती हयात आहे. त्यामुळे मी त्या  व्यक्तीचं नाव घेणार नाही. प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाली, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, प्रवीण महाजन याने प्रमोद महाजन यांचं जीवन उद्ध्वस्त केलं. प्रवीण महाजन हा प्रमोद महाजन यांना सातत्याने ब्लॅकमेल करत होता. प्रमोद महाजन यांना मी चांगलं म्हणत नाही. त्यांच्याकडूनाही काही चुका झाल्या असतील. ते राक्षसही असतील,  मात्र त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला होता, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. प्रवीण महाजन हा पैशांना चलावलेला होता. तो काही काम करत नव्हता. नोकरीवर जायचं नाही. सारखी पगारवाढ मागायची. पैसे मागायचे, असले उद्योग तो करायचा, असा गौप्यस्फोटही प्रकाश महाजन यांनी केला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा बिघडलेली मुलगी असा उल्लेख करणाऱ्या सारंगी महाजन यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली. असं बोलताना लाज वाटत नाही का, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला. तसेच गोपिनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनविरोधात साक्ष दिल्याने सारंगी महाजन असं बोलत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pramod Mahajan's murder: Brother reveals shocking truth after 19 years.

Web Summary : Prakash Mahajan claims Pramod Mahajan's murder was driven by greed and jealousy. Praveen Mahajan allegedly blackmailed Pramod for money, leading to the tragic event. He criticizes Sarangi Mahajan's remarks about Pankaja Munde, linking it to Gopinath Munde's testimony.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईBeedबीड