शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींना मी कशाला भाजपाकडे नेऊ : सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:53 IST

‘राजू शेट्टी व भारतीय जनता पार्टी यांच्यात मध्यस्थ म्हणून मी कशाला काम करू..

ठळक मुद्देआम्ही कमळ चिन्हावरच लढणार

पुणे: ‘राजू शेट्टी व भारतीय जनता पार्टी यांच्यात मध्यस्थ म्हणून मी कशाला काम करू, भाजपा त्यांना हवे असेल तर तसा निर्णय घेईल. त्या जागेवर धैर्यशील माने खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी त्यांचे काम सुरू केले आहे ही चांगलीच गोष्ट आहे’, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.खरीप हंगामाची पुणे विभागाची माहिती घेण्यासाठी खोत सोमवारी (दि. ३) विधानभवनात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.खोत म्हणाले, ‘‘आम्ही लोकसभेसाठी भाजपाबरोबर होतो. आम्ही जागा मागितली नव्हती, आमचा उमेदवारही नव्हता, मात्र आम्ही भाजपासाठी काम केले. आता विधानसभेसाठी मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. त्यांनी मित्रपक्षांना जागा देणार असे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या जागेवर आमचे उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढतील. रयत क्रांती ही शेतकरी संघटना आहे, कोणता राजकीय पक्ष नाही, त्यामुळेच असा निर्णय घेतला आहे.’’किती जागा, कोणत्या जागा असे विचारले असता खोत म्हणाले, ‘‘त्यासाठी येत्या ६ जूनला गंगाधाम येथे रयत क्रांतीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात लोकसभा निवडणूक, त्यातील कामगिरी, शेतकºयांची स्थिती, त्यावरचे उपाय अशा महत्वाच्या विषयांबरोबरच विधानसभेसाठी घ्यायची भूमिका यावरही मंथन होईल. त्यानंतर त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल व त्यात जागांची मागणी केली जाईल. आताच याबाबत नक्की काही सांगणे योग्य नाही.’’मागील वेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याआधी खरीप हंगामाबाबत विभागीय बैठका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट राज्याचीच बैठक ७ जूनला मुंबईत आयोजित केली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा होईल. पेरणी हंगामासाठी त्यांना काय मदत करता येईल याबाबत योजना तयार करण्यात येईल. खते, बियाणे यांचा साठा राज्यात पुरेसा आहे. पेरणीच्या हंगामात खते व बियाणे दुकानदार शेतकऱ्यांना त्रास देतात. काळाबाजार करतात. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी खात्याची पथके असतीलच, पण यावेळी महसूल अधिकाऱ्यांची मदत घेऊन त्यांचाही पथकात समावेश करण्यात येणार आहे. काळाबाजार करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही असे खोत यांनी सांगितले.

........

ज्या बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा लक्षांक पुर्ण केला नाही त्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. मुंबईतील बैठकीत त्यावर चर्चा होईल. अशा सर्व बँकांची नावे केंद्र सरकारला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती खोत यांनी दिली

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस