साहित्य महामंडळ हवेच कशाला?

By Admin | Updated: February 15, 2016 04:13 IST2016-02-15T04:13:25+5:302016-02-15T04:13:25+5:30

साहित्याचा मार्ग फार सुंदर, आनंद देणारा आहे. मात्र या क्षेत्रातील काही मंडळी सूडबुद्धीने वागतात, त्या वेळी वाईट वाटते. साहित्यासाठी तुमच्या-आमच्यासारख्यांची गरज आहे

Why should the corporation corporation be? | साहित्य महामंडळ हवेच कशाला?

साहित्य महामंडळ हवेच कशाला?

जळगाव : साहित्याचा मार्ग फार सुंदर, आनंद देणारा आहे. मात्र या क्षेत्रातील काही मंडळी सूडबुद्धीने वागतात, त्या वेळी वाईट वाटते. साहित्यासाठी तुमच्या-आमच्यासारख्यांची गरज आहे, त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची गरज नाही. त्यामुळे ते बरखास्त करा, असे टीकास्र ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी सोडले.
उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेच्या तिसऱ्या संमेलनाचे रविवारी कर्णिक यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले, आयोजकांच्या चुकीमुळे साहित्य संमेलन चेष्टा व हास्याचा विषय होत आहे. त्यामुळे साहित्याची पुण्याई संपते. चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी संमेलनात तसे झाले.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, बृहन्मुंबई असे वेगवेगळ्या भागात साहित्य मंडळ, साहित्य परिषद आहे. मात्र पुण्याचे तसे नाही. तेथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हेच राज्यातील सर्व विभागीय मंडळ, परिषदांचे नेतृत्व करते, हे काही मनाला पटत नाही. विविध मंडळ व परिषदांना, साहित्याला तुमची-आमची गरज आहे. महामंडळाची नाही, त्यामुळे ते बरखास्त करा. त्याला कोणताही निधी
मिळू नये, असेही कर्णिक यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Why should the corporation corporation be?