शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 21:09 IST

महायुतीमध्ये असूनही नवाब मलिक आपल्या सभा अन् रॅलींमध्ये पीएम नरेंद्र मोदींचा फोटो लावत नाहीत.

Nawab Malik on BJP : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे', असे म्हटले. त्यावरुन आता राजकारण तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडी टीका करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीतील अजित पवारांनीदेखील यावरुन भाजपला घरचा आहेर दिला. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आमची अन् त्यांची विचारधारा वेगळीआजतकशी बोलताना नवाब मलिकांना योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणे विचारण्यात आले. नवाब मलिक म्हणाले की, आमच्या पक्षाची विचारधारा स्पष्ट आहे, आम्ही धर्मावर आधारित राजकारण करत नाही. असे राजकारण आम्हाला मान्य नाही. आमचा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे. आमचे स्पष्ट मत आहे की, जर कोणी असे विधान केले, तर ते चुकीचे आहे. धर्मनिरपेक्षता हा भारताच्या एकतेचा मूळ मंत्र आहे. निवडणुकीत अशी विधाने करून चर्चा होते, पण एकता हाच सर्वात मोठा मंत्र आहे असे मला वाटते. कोणी नकारात्मक राजकारण केले तर लोक ते स्वीकारत नाहीत, अशी विधाने लोकांना मान्य नसल्याचे यूपीच्या निकालावरून दिसून येते.

'आम्ही विभाजनाचे राजकारण करत नाही'मलिक पुढे म्हणतात, महाराष्ट्रात जो कोणी असे राजकारण करतो, त्याच्या विरोधात अजित पवार उभे राहतात. असे काही पक्ष आहेत ज्यांना मुस्लिमांची मते हवी आहेत, परंतु त्यांच्या मुद्द्यांवर बोलणे टाळतात. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. फुटीचे राजकारण करणाऱ्यांना आम्हाला संदेश द्यायचा आहे की, त्यांनी असे राजकारण करू नये, ते देशाच्या आणि जनतेच्या हिताचे नाही. आम्ही असे राजकारण कधीच करत नाही, अशी स्पष्टोक्त मलिकांनी दिली.

नरेंद्र मोदींचा फोटो का वापरत नाही?दरम्यान, नवाब मलिकांनी आपल्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींचा फोटो लावला नव्हता. याबाबत त्यांना विचारत्यावर मलिक म्हणाले की, मोदीजींचा पक्ष माझ्याविरोधात निवडणूक लढवत आहे. कोणाचा फोटो वापरायचा, कोणाच्या नावाने मते मागायची, हा आमचा निर्णय आहे. आम्ही आमच्या विचारधारेवर मते मागत आहोत, आम्ही आमच्या नेत्यांचे फोटो वापरू. आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत. विचारांशी आमची तडजोड नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nawab malikनवाब मलिकNarendra Modiनरेंद्र मोदी