अधिकाऱ्यांचे सत्कार समारंभ कशासाठी?
By Admin | Updated: August 28, 2014 02:08 IST2014-08-28T02:08:25+5:302014-08-28T02:08:25+5:30
शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शासक ीय कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप समारंभानिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. परंतु जिल्हा

अधिकाऱ्यांचे सत्कार समारंभ कशासाठी?
जिल्हा परिषद : बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसवले
नागपूर : शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शासक ीय कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप समारंभानिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसवून निरोप समारंभाचा धडाका लावला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम १९७९ च्या नियम १३ नुसार शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप निमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचारी वा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे शासन निर्देश आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण गाडीगोने यांच्या सहमतीनेच असे सत्कार समारंभ आयोजित होत असल्याने कार्यवाही कोण करणार. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने निरोप समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांवर निधी संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या नावाखाली वसुली सुरू आहे.
वर्गणी दिली नाही तर वरिष्ठ नाराज होतील म्हणून इच्छा नसतानाही कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्याची व्यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडली.
अशा कार्यक्र म निमित्ताने गोळा करण्यात आलेल्या पैशाचा जमाखर्च ठेवला जात नाही. त्यामुळे कार्यक्र माच्या निमित्ताने नेमका किती निधी गोळा करण्यात आला, कार्यक्र मावर किती खर्च झाला. याचा हिशेब नसतो.
गत काळात हिंगणा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहायक कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांची बदली झाल्यानिमित्ताने तर खंड विकास अधिकारी रामदास धांडे यांची पदोन्नती झाल्याने सदर भागातील हॉटेलमध्ये गाडीगोने यांच्या उपस्थितीत जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी चांगलीच गाजली होती. असे असतानाही निरोप समारंभाचे कार्यक्र म थांबलेले नाही , हे विशेष.(प्रतिनिधी)