शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:43 IST

प्रा. मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुंबई - शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच शिवसेनाउद्धव ठाकरे गटातील नेत्या, विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) प्रवेशही केला आहे. यानंतर आत्यांना लगेचच शिवसेना सचिव तथा पक्षप्रवक्तेपदही देण्यात आले आहे. मात्र प्रा. मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात कायंदे यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत भाष्य केले.   

अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच -कायंदे म्हणाल्या, "मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेली दहा वर्ष, काम करत होते. त्यांनी मला विधानसभेचे सदस्यत्वही दिले. पण असे काय घडले? की मी आता मुख्यमंत्री एकनाथन शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मी २०१२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला ती बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना होती आणि आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे. हे खरे आहे. अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्षबदल काही केलेला नाही." 

शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा एकच -दुसरे म्हणजे, "माझा राजकीय प्रवास मोठा आहे. मी भारतीय जना पार्टीतही काम केले आहे. सर्वप्रथम मी एक मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केले आहे. त्यामुळे शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा एकच होती. त्यामुळे मी भाजपतून शिवसेनेत आले. अर्थात माझी विचारधारा तीच राहिली.

जुन्या जानत्या शिवसैनिकांना महाविकासआघाडी कधीही पसंत नव्हती -२०१९ मध्ये भाजप शिवसेना एकत्रित लढले आणि नंतर युती तुटली. याला अनेक कारणे आहेत. ती अनेक वेळा स्पष्ट झाली आहेत. महाविकास आघाडीसमोर अनेक समस्या येत गेल्या. यात विचारधारा न पटण्यासारखी होती. मात्र पक्षादेशाचे आम्ही आवडत नसतानाही पालन केले. जुन्या जानत्या शिवसैनिकांना ही महाविकासआघाडी कधीही पसंत नव्हती. पण आपण पक्षात असल्याने पक्षाची जी भूमिका ती आपली भूमिका, असे मानले. पण पाणी डोक्यावरून जायला लागते. मग तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो, आपण अत्ताच पाहिलं की, पक्ष बळकटी करणासाठी ज्यांना जांना जवळ केलं. एक प्रवक्ता म्हणून ती गोष्ट डिफेंड करणं कठीन जात होते.

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारधारा भरकटतेय -कायंदे म्हणाल्या, मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला, कारण मी एक संघटनात्मक काम करणारी कार्यकर्ता आहे. मला संघटनात्मक काम करायची पहिल्यापासूनच इच्छा होती आणि मी ते करत राहिले. भाजपत असताना मी १० वर्ष मुंबई महिला आघाडीची अध्यक्ष होते, प्रदेश उपाध्यक्षही होते. त्यामुळे संघटनात्मक काम करणे हा माझा पिंड आहे. एवढेच नाही, तर एकंदरीतच शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारधारा भरकटतेय. ती विचारधार, माझ्या मुळ हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दिवसेंदिवस दूर जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे