शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आमदाराने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:48 IST

आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम केले गेले. भाजपामध्ये एक नेता बसविण्यात आला. त्यामुळे कुटुंबाची बदनामी भाजपाकडून होतेय, ही उद्धव ठाकरेंची समज झाली, असे दीपक केसरकर म्हणाले.

घराला आग लागली असेल तर आधी ती बुझवावी लागते. नंतर एकत्र येता येते. मी आदित्य ठाकरेंशी बोलत बोलत हॉ़टेलवर आलो. तुम्ही सगळे मिळून जे करू शकला नाही, ते मी एकट्याने केले आहे. अजय चौधरी तिथे आले, सुनील शिंदे आले, माझी गाडी निघाली, माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. मी त्यांना फोन करून सांगितले मी हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा सावंतवाडीचे शिवसेना आमदार आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. 

 जे आमदार गेले ते आज सांगत होते का, त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे होते. त्यांना बळ दिले जात होते. याचा अर्थ काय? आम्हाला उद्धव ठाकरे साहेब उपलब्ध होत नव्हते. यामुळे या आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे आपल्या कैफियती मांडल्या. यामुळे हे सारे आमदार शिंदेंच्या जवळ गेले. त्याच्यामागची भूमिका मी उद्धव ठाकरेंना काल समजावली. हे उद्धव ठाकरेंशी बंड नाहीय. आपल्याला भाजपासोबत जावे लागेल, असे दीपक केसरकर म्हणाले. 

मी कोणाला घाबरत नाही. मी देखील शिंदे यांच्याकडे जाऊ शकतो. मला कोण अडवणार, मी पोलीस आयुक्तांना फोन करेन. कायदा सुव्यवस्था आहे. आमचा मान ठेवायला हवा होता, माझ्या घरी आज माणसे पाठविली, असा आरोप केसरकर यांनी युवासेनेने दिलेल्या वागणुकीवर केला आहे. 

आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम केले गेले. भाजपामध्ये एक नेता बसविण्यात आला. त्यामुळे कुटुंबाची बदनामी भाजपाकडून होतेय, ही उद्धव ठाकरेंची समज झाली. पंतप्रधान आणि ठाकरे यांच्यात चांगले प्रेमाचे संबंध आहेत. परंतू कुटुंबाची बदनामी होऊ लागल्याने भाजपा आणि ठाकरेंत अंतर वाढत गेले, असा आरोप त्यांनी एका नेत्याचे नाव न घेता केला. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करणार नाही. त्यांनी शिंदेंची भूमिका मान्य करावी, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत न जाता भाजपासोबत जावे, ही भूमिका त्यांना माहिती आहे, शेवटी निर्णय घेणे ठाकरेंच्या हातात आहे. गेले दोन वर्षे मी त्यांना हेच सांगत आलोय, असेही केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDipak Kesarkarदीपक केसरकरAditya Thackreyआदित्य ठाकरे