शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:49 IST

"'तो' शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते..."

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणूनही घोषित केले आहे. मात्र, बच्चू कडू त्यांना कडाडून विरोध करत आहेत. यामुळे नवनीत यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यातच, रविराणा यांनी नुकतेच बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांना, अमरावतीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता बच्चू कडू यांनी रवी राणांनाही लक्ष्य केले. याचवेळी त्यांनी गुवाहाटीला जाण्यामागचे कारणही सांगितले.

रवी राणा यांच्या आवाहनावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जाता तर पैसेच खाऊन जातात, आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही... अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे, तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू." कडू टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.

गुवाहाटीला जाण्यासंदर्भात काय म्हणाले बच्चू कडू? -"जे काही आम्ही गुवाहाटीला गेलो असू, दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला होता म्हणून गेला होता बच्चू कडू. तो शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते. आम्ही ज्या दिव्यांगांसाठी लढत होतो, त्या दिव्यांगांचे स्वप्न, तो क्षण त्यांच्या समोर आणायचा होता. 15 ते 25 वर्षांचे आंदोलन यशस्वी झाले. शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय दिले. खरे तर शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय दिले, म्हणून आम्ही युतीच्या सोबत आहोत. नाही तर दुसरे काही कारण नाही. तर आमच्या मतदार संघ्यात हा खोके घेणारा आमदार नाही, तर दणके देणार आमदार आहे, हे दाखवून देऊ." असेही कडू यांनी म्हटले आहे.

...तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे -आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तसेच, बच्चू कडू यांनीही, सर्वच मोठ्या नेत्यांनी एकत्रित होऊन या निवडणुकीकडे बघायला हवे. आपल्या पेक्षाही ज्याला पाडायचे आहे, ते टार्गेट लक्षात घेऊन समोर जायला हवे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार निवडून येतो हे महत्वाचे नाही, तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे आहे, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाBachhu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदे