शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गुवाहाटीच्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर का आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 15:05 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. पण मंत्री गुलाबराव पाटील आणि सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर गुवाहाटीला गेलेले नाहीत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी गुवाहाटी दौऱ्याला पाठ फिरवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली.  

"पुन्हा एकदा आमच स्वागत गुवाहाटीतील लोकांनी आमचे स्वागत केले, याच आम्हाला आनंद आहे. आसामचे तीन मंत्री आमच्या स्वागतासाठी आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी आमची धावपल होती, त्यामुळे आता आम्ही पुन्हा देवीच्या दर्शनाला आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

"काही आमदार गुवाहाटीला आलेले नाहीत, त्या आमदारांनी माझी परवानगी घेतली आहे. त्या आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत म्हणून ते गुवाहाटीला आलेले नाही. त्यामुळे विरोधक आमच्यावर काय टीका करतात त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांना काही काम नाही म्हणून ते टीका करत आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

मी नाराज नाही: आमदार अनिल बाबर 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले. मात्र सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर गुवाहाटीला गेले नाहीत. यामुळे बाबर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आमदार बाबर यांनी स्पष्टीकरण दिले.

शिंदे गटातील आणखी एका आमदाराची गुवाहाटीला जाण्यास गैरहजेरी, म्हणाले..आमदार बाबर म्हणाले की, सरकार स्थापनेच्या घडामोडीवेळी माझी पत्नी आजारी पडली. तिचे त्या आजारपणात निधन झाले. आता २७ नोव्हेंबररोजी तिचा जन्मदिवस असून, आमच्या घरी घरगुती कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी हा दौरा रद्द केला. या दौऱ्याला मी गेलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी नाराज आहे. मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कोठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना