शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पुस्तके खपत का नाहीत? अकादमी विजेत्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:46 IST

Marathi Books: राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी भाषा व्यवहार १२ कोटी लोकांशी संबंधित आहे. राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग मराठी साहित्यातील पुस्तकांचा हवा तसा खप का होत नाही. ५०० पुस्तकांची आता तर ३०० पुस्तकांची एक आवृत्ती निघते, अशी खंत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक प्रदीप कोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या छोट्याशा गावातील असलेले आणि सध्या मुंबईत वडाळा येथे राहणारे प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या ‘लोकवाङ्मय गृह’ने प्रकाशित केलेल्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. संवेदनशील कवी मनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी, तसेच महानगरातील वास्तव मांडणारी ही कादंबरी आहे.

...म्हणून लेखकांना नैराश्य येते, लेखन थांबतेमुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत माझ्यासारख्या गावातून आलेल्या लेखकांना पटकन ओळख मिळत नाही. साहित्यविश्वात पुरेशी स्पेस, तसेच प्रोत्साहन मिळत नाही. त्यातून युवा लेखकांना नैराश्य येते आणि त्यांचे लेखन थांबते. सुदैवाने माझ्याबाबत असे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. या पुरस्काराने मला रेक्गनिशन मिळाले आहे. अर्थात त्यामुळे माझी जबाबदारीही वाढली आहे. माझ्या घरात अक्षराशी ओळख झालेला, तसेच दहावी झालेली मी गावातील पहिली व्यक्ती होतो. बारावीनंतर मी मुंबईत आलो. तरुण वयात साहित्यिकाचे कौतुक झाले तर एक सशक्त साहित्यिक घडण्यास हातभार लागतो, असे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक, प्रदीप कोकरे म्हणाले.

बालसाहित्य माणूस घडविण्याची पायरीनांदेड : साहित्य अकादमीचा यंदाचा 'बाल वाङ्मय पुरस्कार' नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. चांगले बालसाहित्य ही चांगला माणूस घडविण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. ही पायरी भक्कम असली पाहिजे, कारण आजच्या गढूळ आणि मूल्यहीन होत चाललेल्या वातावरणात बालसाहित्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश सावंत यांनी दिली. आजच्या प्रदूषित सामाजिक वातावरणात माणसाचे यंत्र बनत चालले आहे. माणसाचे यंत्र होऊ द्यायचे नसेल, तर बालकांच्या हातात योग्य वयात योग्य ते पुस्तक देणे अत्यावश्यक आहे. ही गरज ओळखून मी निष्ठेने बालसाहित्याचे लेखन करत आलो आहे. 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र