शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुली बेपत्ता  का होत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 10:33 IST

...आईवडिलांच्या प्रेमाचा दोर तोडून मग अनेक मुलींचे दोर असुरक्षिततेच्या हिंदोळ्याला बांधले जातात. मुलीच्या बऱ्या-वाईट कल्पनांनी आयुष्यभर झुरत राहणेच अनेक कुटुंबांच्या वाट्याला येते.

शहाजी जगताप, याचिकाकर्ते -बाळाचा पाळणा ते तारुण्याचा झुला हे अंतर जिवापाड प्रेम करत, तिच्या स्वप्नांना बळ देत लाखो पालक स्वत:चे स्वप्न जगत असतात. आईवडिलांच्या प्रेमाचा दोर तोडून मग अनेक मुलींचे दोर असुरक्षिततेच्या हिंदोळ्याला बांधले जातात. मुलीच्या बऱ्या-वाईट कल्पनांनी आयुष्यभर झुरत राहणेच अनेक कुटुंबांच्या वाट्याला येते. याच कटू  स्वानुभवाने पोळल्यानंतर लाखो पालकांच्या वेदनांचा हा धांडोळा मांडत मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलिसांसह विविध शासकीय यंत्रणांकडून तपासाबाबत दुर्लक्ष करण्याची जी मानसिकता आहे, त्यावर आम्ही बोट ठेवले आहे.

मुली, महिलांच्या बेपत्ता प्रकरणात होत असलेल्या दुर्लक्षावर आकडेवारींच्या आधारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शासनानेच सादर केलेल्या एका अहवालातील आकडेवारी थक्क करणारी आहे. महाराष्ट्रात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत अठरा वर्षांखालील बेपत्ता मुले व मुलींची संख्या १२ हजार ४७ इतकी आहे. तर, अठरा वर्षांवरील बेपत्ता तरुणी व महिलांची संख्या याच कालावधीत १ लाख ८४२ इतकी नोंदली गेली आहे. सातत्याने मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.

देशभरात याच कालावधीत २ लाख १० हजार ६८२ अल्पवयीन मुले व मुली, तर ५ लाख ७९ हजार १७९ सज्ञान मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमाण यात अधिक दिसून येते. हे तपासयंत्रणांच्या निष्क्रियतेचे लक्षण आहे. गेल्या काही वर्षांत नोंदवलेल्या निरीक्षणानुसार शासकीय यंत्रणेत अनेक दोष आहेत. बेपत्ता होणाऱ्या मुलींची तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून ती सज्ञान आहे का? अशी विचारणा होते. सज्ञान असेल तर तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे किंवा ती कोणासोबत तरी पळून गेली असणार, असा तर्क लावून पोलिस नामानिराळे होतात.

प्रत्यक्षात या मुलींचा वापर अनैतिक, बेकायदेशीर तसेच हिंसेसाठी केला जाऊ शकतो. त्याची काळजी पालकांमध्ये आहे. त्याचा तपास केला जात नाही. कालांतराने अशा मुलींना संबंधित पुरुषाने झिडकारले तर समाजातील सर्व दोर तुटलेल्या या मुली वाममार्गाला जाऊ शकतात. खून, अपहरण या शक्यतांच्या अंगाने तपास केला जात नाही. महिला व बालकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाहांसाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या अुनदानाचा लाभ घेऊन कालांतराने मुलीला झिडकारले तर हा विभाग दिलेले अनुदान परत का घेत नाही? किंवा केवळ अनुदानासाठी असे प्रकार होत नाहीत ना? याचीही चौकशी केली जात नाही. नोटरीवर होणारे विवाह, समवयीन मुलांच्या स्वाक्षऱ्यांवर नोंदले जाणारे विवाह कितपत कायदेशीर ठरतात, याचाही विचार नियमांच्या तराजूत तोलून केला जायला हवा. बाहेरील जगात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत अनभिज्ञ असणाऱ्या मुलींनी सज्ञान म्हणून कागदपत्रावर स्वाक्षरी केली तर तिच्या निर्णयाच्या योग्य-अयोग्यतेची किंवा मुलाच्या पार्श्वभूमीची तपासणी करणारी यंत्रणा कुठे आहे? पालक याच गोष्टींनी भयभीत होत आहेत. चिंतेचे हे विश्व दरवर्षी अधिक व्यापक होत लाखो पालकांना कवेत घेत आहे. जे आंतरजातीय विवाह सुरक्षित आहेत, परस्परसहमतीने, घरच्यांना कल्पना देऊन, प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची शहानिशा करून, कायदेशीर पातळीवर तोलून होतात, त्यांच्याबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र छाननीची हीच गोष्ट अस्तित्वात नसल्याचे दु:ख मुलींच्या पालकांना आहे.- शब्दांकन : अविनाश कोळी 

टॅग्स :WomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र