शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:55 IST

याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याऐवजी इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण देण्याकरिता वर्ग निर्माण करण्याचा पर्याय सरकारपुढे होता. तरीही स्वतंत्र प्रवर्ग का आवश्यक आहे, या मुद्यावर याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले.

मराठा समाजाचे मागसलेपण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयोगापुढे कोणते मापदंड ठेवले आहेत? असा प्रश्नही न्यायालयाने सरकारला केला. इंद्रा साहनी खटल्याच्या निकालात हे मापदंड नमूद करण्यात आले आहेत. त्यात सामाजिक आणि भौगोलिक स्थितीचा समावेश आहे, असे ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्याशिवाय शुक्रे आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या पूर्णपीठापुढे या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली.

रद्द केलेल्या आणि नव्या कायद्यात फरक काय?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील फेटाळलेल्या २०१८च्या कायद्यात आणि या नव्या कायद्यात फरक काय? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाच्या या प्रश्नावर याचिकाकर्त्यांच्यावतीने  ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सांगितले की, केवळ टक्केवारीत फरक आहे. दोन्ही कायदे सारखेच आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने होत आहेत म्हणून आरक्षण देणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन सरकार वारंवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा तयार करणार असेल तर कसे होणार? बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही का? असा युक्तिवाद संचेती यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय