आक्षेपार्ह डीपीमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन अटकेत
By Admin | Updated: February 22, 2017 15:45 IST2017-02-22T15:45:19+5:302017-02-22T15:45:19+5:30
वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनने ग्रुपचा आक्षेपार्ह डीपी ठेवल्याप्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आक्षेपार्ह डीपीमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन अटकेत
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने ग्रुपचा आक्षेपार्ह डीपी ठेवल्याप्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. जिल्ह्यातील वाकद येथील ही घटना आहे.
वाकद गावातील हरीश भारत झीजान यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शाहरुख खा. अलीयार खा. असे आहे. आरोपीने ‘ऑल इन वन ग्रुप’ हा ग्रुप बनवला होता.
ग्रुपच्या डीपीचा फुलपाखराचा फोटो बदलून त्यानं आक्षेपार्ह प्रोफाईल फोटो ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय रिसोड ते मेहकर मार्ग वाकद येथे काही तासांसाठी बंद ठेवण्यात आला. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अॅडमिनवर अटकेची कारवाई केली.