शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 06:20 IST

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे पुढील सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावे, याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. २३ ऑगस्टपासून प्रलंबित असलेली सुनावणी बुधवारी घटनापीठापुढे झाली. या घटनापीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

एकनाथ शिंदे गटाने आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुनावणीसाठी असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांच्या अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांना पाचारण करणे व इतर याचिकांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मज्जाव करावा, असा अर्ज बुधवारी दाखल केला. आयोगाचे वकील अरविंद दातार म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कुणी आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागतो. 

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली.

शिंदे गट : निवडणुका तोंडावर, चिन्हाबाबत निर्णयाची गरज -- या वेळी शिंदे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल म्हणाले की, निवडणूक आयोगाला एखादा निर्णय घेण्यापासून रोखता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आलेल्या असताना यावर निर्णय होण्याची गरज आहे. - यापूर्वी निवृत्त सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून निर्बंध लादलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

ठाकरे गट : मागच्या सुनावणीतही निर्णय न घेण्याचे आदेश -- ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कौल यांचे म्हणणे खोडून काढले. ३ ऑगस्टच्या सुनावणीत आयोगाने चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. - मांडण्यासाठी गटाला काही दिवसांची मुदतसुद्धा दिल्याचेही कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अपात्र आमदारांना निवडणूक आयोगाकडे दाद मागता येऊ शकत नसल्याचा दावा केला.  

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना