शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अख्ख्या गावाचा गहू आगीत खाक !

By admin | Updated: March 21, 2017 23:17 IST

आरल गावात निराशा : पंधरा लाखांचे नुकसान; ६१ शेतकऱ्यांना फटका, मळणीसाठी एकत्र केलेला गहू भस्मसात

मणदुरे : पाटण तालुक्याच्या चाफोली विभागातील पुनर्वसित आरल गावात अचानक लागलेल्या आगीत शेतात कापून ठेवलेला ६१ शेतकऱ्यांचा गहू जळून खाक झाला. तसेच शेतातील गवताच्या गंजी, शेणखत, जळावू लाकडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरणातून पुनर्वसित झालेले आरल गाव चाफोली विभागात आहे. या गावात ६१ कुटुंबे आहेत. गावच्या शिवारातील गहू एकत्र गोळा करून आरल येथील भैरी-केदार मंदिराशेजारी मोकळ्या जागेत सर्व कुटुंबांचा गहू मळणीसाठी एकत्र करून ठेवला होता. एकत्र केलेला गहू मळणी यंत्राने मळायचा होता. दोन दिवसांत या ठिकाणी मळणी यंत्र येणार होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, मंगळवारी दुपारी अचानक आग लागून सर्व गहू जळून खाक झाला. गावकामगार तलाठी पी. पी. शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सत्यजितसिंंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, राजेश पवार, नवनाथ कदम, माजी सरपंच विजय शिंंदे, हरीभाऊ सूर्यवंशी, सुभाष पवार, नथुराम झोरे, रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या आगीत श्रीपती पवार, काशिनाथ पवार, अशोक पवार, रामचंद्र पवार, मारुती पवार, गोविंंद धुमाळ, तानाजी पवार, बाबूराव पवार, सीताराम पवार, किसन पवार, निवृत्ती पवार, बनाबाई पवार, नारायण पवार, रामचंद्र पवार, अर्जुन पवार, वैजंता पवार, कलाबाई पवार, सीताराम पवार, राजाराम पवार, पांडुरंग पवार, वसंत पवार, लक्ष्मी पवार, लक्ष्मण पवार, पाराबाई पवार, ज्ञानू पवार, तुकाराम पवार, मोहन पवार, आनंदा पवार, जगन्नाथ पवार, बाळाबाई पवार, चंद्रकांत कदम, गोविंंद कदम, विलास कदम, बबाबाई कदम, संगीता कदम, बंडू कदम, निवृत्ती पवार, शिवाजी पवार, रामचंद्र सपकाळ, तानाजी सपकाळ, पांडुरंग पवार, शंकर कदम, रामचंद्र कदम, चंद्रकांत सपकाळ, भागुजी सपकाळ, प्रकाश सपकाळ, पांडुरंग कदम, बंडू कदम, श्रीरंग पवार, विठ्ठल यादव, अशोक कदम, अंकुश कदम, विश्वास कदम, विश्वनाथ पवार, पांडुरंग पवार, धोंडिराम पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)जीप चालकाचे प्रसंगावधानआरल मार्गावरून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक जीप जात होती. त्यावेळी गव्हाला आग लागल्याचे जीप चालकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या चालकाने प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. ग्रामस्थांनी तातडीने फोन करून पाटण येथील अग्निशामक पथकास पाचारण केले. अग्निशामक पथक आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत गहू, गवताच्या गंजी, जळावू लाकडे, शेणी, शेणखत असे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.