शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आषाढीच्या तोंडावर पेच; महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे? सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 10:12 IST

आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे.    

 विठ्ठल खेळगी -

सोलापूर : राज्यातील राजकीय पेच पाहता आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सन २०१८ साली मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांची संधी हुकली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. कोरोना काळात ठाकरे यांनी स्वत: मुंबईपासून पंढरपूरपर्यंत आठ तास ड्रायव्हिंग करीत पूजेला उपस्थिती लावली. यंदाही पूजेला ठाकरेच स्टेअरिंग हातामध्ये घेणार की देवेंद्रांना हुकलेली संधी पुन्हा मिळणार, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे.    यंदा आषाढी एकादशी १० जुलैला आहे. आषाढीच्या तोंडावर राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. तत्पूर्वीच मागील आठवड्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली आणि पूजेचे निमंत्रणही देण्यात आले आहे. त्यानंतर आता दिवसागणिक राज्यातील राजकीय वातावरण बदलत आहे. सरकार स्थिर राहिल्यास पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना महापूजेची संधी मिळणार आहे. तत्पूर्वीच जर नवीन सरकार येऊन मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यास त्यांना २०१८ साली हुकलेली संधी मिळणार आहे. 

दोन वेळा महापूजेला विरोधआतापर्यंत दोन वेळा महापूजेला विरोध झालेला आहे. १९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना महापूजा करता आली. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. २०१८ मध्येही मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोध झाला होता.स्वागताला मामा की बापू?पालख्यांच्या स्वागताला पालकमंत्री हजेरी लावतात. यंदा पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे उपस्थित राहणार की शहाजीबापूंना संधी मिळाणार याची उत्कंठा लागली आहे.

आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजेची संधीयशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे