राणेंना कोण नको म्हणणार?

By Admin | Updated: March 27, 2017 03:52 IST2017-03-27T03:52:53+5:302017-03-27T03:52:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत

Who will not say Rana? | राणेंना कोण नको म्हणणार?

राणेंना कोण नको म्हणणार?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांना नको कोण म्हणेल, असा सूचक प्रतिप्रश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना केला.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या राणे आणि आवाडे यांच्या प्रवेशाबद्दल मला माहीत नाही; परंतु त्या-त्या भागांतील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून असे निर्णय घेतले जातात. ते काम प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. राणे हे शिवसेनेत जातील की भाजपमध्ये अथवा काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाहीत, हे कोणीही सांगू शकत नाही. पण हवी-हवीशी वाटणारी अशी माणसे फार कमी असतात, असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा असली तर ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. २८८ पैकी जवळपास २०० आमदार आमचे आणि शिवसेनेचे असल्यानंतर ही चर्चा निरर्थक आहे. वादाचे अनेक विषय असतात. त्यावरून मतभेद होतात. मंत्रिपदे, त्यांचा दर्जा, त्यांची जबाबदारी असे अनेक विषय असतात. घरात पती-पत्नीचेही नेहमी भांडण होत असते तसेच हे विषय आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

‘मातोश्री’वर जाणार नाही

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मी आणि सुधीर मुनगंटीवार ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा आहे; पण आता तसे काही कारण नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सपत्निक भोजनाचे निमंत्रण दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Who will not say Rana?