काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे

By Admin | Updated: November 4, 2016 04:54 IST2016-11-03T18:26:55+5:302016-11-04T04:54:09+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाकडे राहणार याबाबत राजकिय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते.

Who will inherit the time Sharad Pawar's successor - Supriya Sule | काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे

काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना मानसपुत्र मानले होते, आता शरद पवार यांचा वारस कोण असेल हे काळच ठरवेल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केले. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार याविषयी नेहमी तर्कवितर्क लढविले जातात, याकडे लक्ष वेधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला येत्या २२ फेब्रुवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘आघाडी सरकार सत्तेवर असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने भर देण्यात आला. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी वर्गामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे, यावर संसदेमध्ये आवाज उठविणार आहे. कोपर्डी प्रकरण हाताळण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.’’
आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आरक्षण हे सुळे, आठवले, आंबेडकर यांच्या मुलांना नको असून ते वंचितांसाठी हवे आहे,असेही सुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Who will inherit the time Sharad Pawar's successor - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.