शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमधून रक्षा खडसेंविरोधात कोण लढणार? रोहिणी खडसे की... एकनाथ खडसेंनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:30 IST

Raver Lok Sabha Constituency: रावेर लोकसभा मतदारसंघातमधून भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, असा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा कुणाला उमेदवारी देणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.  मात्र या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले पक्षाचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी कोंडी केल्याचे बोलले जात होते. मात्र येथून शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, त्यामुळे रावेरमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगेल, असा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. तसेच रोहिणी खडसे ह्यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. त्या केवळ विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असा विचार करून मागच्या चार-पाच वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे ह्या सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या घोषणेमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे कुटुंब आमने-सामने येईल, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. तसेच येथून निवडणूक लढवण्यासाठी पक्षामधील सात ते आठ उमेदवार इच्छूक आहेत. त्या उमेदवारांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेण्यात आली. तसेच यापैकी काही उमेदवारांची छाननीही करण्यात आली. आता त्यामधून योग्य उमेदवाराची निवड ही उद्या होण्याची शक्यता आहे, असे  एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेRohini Khadseरोहिणी खडसेraver-pcरावेरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४