कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:05 IST2017-11-08T05:07:19+5:302017-11-14T13:05:32+5:30
महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे.

कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?
मुंबई : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे. त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट
स्टायलिश अवॉर्ड’ वितरण सोहळा येत्या १४ नोव्हेंबरला मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील, मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा नेहमीप्रमाणे हटके आणि
खास असणार आहे. ज्या सेलिब्रिटीजना पाहून वाह...
क्या स्टाईल है भाई, अशा कमेंटस् येतात, अशी मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड किंवा मग टीव्ही जगतातील सेलिब्रिटीज या पुरस्काराचे मानकरी ठरू शकते. त्यामुळे या सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
येत्या मंगळवारी ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये हा अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा थाटात तसेच जल्लोषात पार पडणार आहे.
या सोहळ्याला बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्हीवरील चमकते तारे तसेच उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेता आणि सुपरस्टार हृतिक रोशनने प्रमुख उपस्थिती लावली होती. नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरनेसुद्धा उपस्थिती दशर्वित चारचाँद लावले होते.