शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

By अतुल चिंचली | Updated: December 8, 2024 07:56 IST

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो...

- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय आमदार मित्रहो,सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... एका पक्षाचे मुख्यमंत्री असलेले सरकार असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचे एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री किंवा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे कसेही सरकार बनले तरी प्रश्न एकच आहे, मंत्री कोणाला करावे... तुमच्या मनातल्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध -जात बघावी की समाज... की सांभाळावे विभागाचे गणित... 

की झुगारून द्यावीत सगळी बंधनं आणि द्यावे फक्त आणि फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य? की संधी द्यावी निष्ठावंतांना...? त्यातही पक्षातल्या निष्ठावंतांना, की आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांना..?जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी द्यावी संधी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना..?की गांधीजींवर प्रेम असणाऱ्या आपल्याच नेत्यांना द्यावी मंत्रिपदाची संधी..?गांधींचे फोटो ज्याच्याजवळ जेवढे जास्त तेवढा तो आपल्या कामाचा...या विचारांमुळे दादा..., भाऊ..., साहेब...तिघेही परेशान आहेत बाबूराव... म्हणून तरकोणाला संधी द्यावी हाच एक प्रश्न आहे..?

साहेबांपुढे वेगळेच प्रश्न आहेत...तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकरअब्दुल सत्तार यांनाच किती वेळा संधी देता...आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?असा सवाल चार वेळा निवडून आलेले,आपल्यावर निष्ठा ठेवून आपल्या सोबत आलेले,अनेक नेते कळवळून विचारत आहेत...त्यांना काय उत्तर द्यायचे? या विचारात साहेब रात्रभर अस्वस्थ होते...कारण, मंत्री कोणाला करावे..?हाच एक सवाल आहे... जो दिवस-रात्र सगळ्यांना छळतो आहे...

तिकडे दादांचेही असेच झाले आहे...छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना डावलून शिफारस तरी कोणाच्या नावाची करायची? मराठा तितुका मेळवावा... अशी भूमिका घ्यायची की, देवाभाऊसारखी ओबीसींची जबरदस्त मोट बांधायची..?की पदरी पडले पवित्र झाले, असे म्हणत मिळेल ती मंत्रिपदं घ्यायची आणि गपगुमान बसायचे पाच वर्षे विरोध न करता...सारखा एकच प्रश्न छळतो आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...

देवाभाऊकडे जाऊन सांगायचे कसे..?लॉबिंग करायचे की स्वतःचे मार्केटिंग...देवाभाऊपुढेही प्रश्न आहेतच...वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल पांघरणाऱ्यांनादूर करून, देऊन टाकावी का संधी नव्या रक्ताला? आणि घ्यावा वसा नवनिर्माणाचा...की, ज्येष्ठांना द्यावे पाठवून सल्लागार मंडळात,आणि नव्यांच्या हाती द्यावी राज्याची दोरी पक्षाचे निष्ठावंत महत्त्वाचे; की आपले...?प्रश्न अनेक आहेत, पण छळणारा प्रश्न एकच आहे यावेळी मंत्री करावे तरी कोणाला..?

की ठेवाव्या मंत्रिपदाच्या काही खुर्च्या रिकाम्या,वर्षानुवर्ष हेच तर करत आले आहेत, सगळे... त्यातली एक खुर्ची तुमच्यासाठीच ठेवली आहे, असे सांगून घ्याव्या काढून पालिका निवडणुका की वाटावीत मन कठोर करूनमहामंडळांची गाजरे नेहमीप्रमाणे राज्यभर... 

कोणी म्हणतील तुम्ही इतके कठोर का झालात..?एका बाजूला आम्ही ज्यांना मोठे केले, तेच आम्हाला विसरून गेले... दुसऱ्या बाजूला आम्ही केलेली मदतही काही जण विसरून गेले...मग अशा विस्कटलेल्या प्रश्नांचे, हे सगळे गाठोडे घेऊन दयाघना प्रश्न सोडवण्यासाठी जायचे तरी कोणाकडे..?कारण या सगळ्याच्या वरही एक प्रश्न छळतोच आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...- तुमचाच बाबूराव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे