बसमधील आरक्षित जागा कुणाची ?

By Admin | Updated: May 22, 2014 23:34 IST2014-05-22T23:31:13+5:302014-05-22T23:34:01+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावतीने प्रवाशांना सुख सुविधा मिळावी याकरीता आमदार,खासदार, पत्रकार,महिला,अपंग यांच्यासाठी प्रवाशांसाठी आरक्षित जागा केली आहे.

Who is the reserved bus in the bus? | बसमधील आरक्षित जागा कुणाची ?

बसमधील आरक्षित जागा कुणाची ?

कारंजालाड: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावतीने प्रवाशांना सुख सुविधा मिळावी याकरीता आमदार,खासदार, पत्रकार,महिला,अपंग यांच्यासाठी प्रवाशांसाठी आरक्षित जागा केली आहे. मात्र या जागेचा उपयोग आरक्षित असणार्‍या प्रवाशांना मिळत नसून, याचा लाभ दुसराच प्रवासी घेतो आहे. याला जबाबदार बसमधील वाहक व चालक असून तो याकडे हेतूस्परस्पर दुर्लक्ष करतो त्यामुळे बसमध्ये या आरक्षित जागेवर बसण्यावरुन वाद-विवाद होतात. याकरिता वाहकांवर याबाबत कडक कार्यवाही करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पत्रकार, महिला, अपंग, आमदार, खासदार यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र,वाहक याची अंमलबजावणी करीत नसल्याने राखीव जागांना बगल मिळत आहे. बसमध्ये चढल्यानंतर सिटच्या मागे ज्यांच्यासाठी सदर जागा राखीव आहे त्यांचे नाव लिहिलेले आढळून येते. ज्या सीटवर नाव नसेल त्या सर्व जागा सर्वसामान्य प्रवाशाकरिता असल्याचे समजले जाते. दरम्यान, महामंडळाने बसमध्ये उदात्त हेतूने पत्रकार, महिला व अपंग व्यक्तीसाठी आरक्षण दिले असले तरी याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महिला व अपंगाना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ज्या अपगांना डोळाने दिसत नाही, पायाने चालता येत नाही अशांनासुध्दा आरक्षीत जागेचा फायदा होत नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसमध्ये अंपगाची व महिलाची मोठय़ा प्रमाणात अवेलना होत आहे. याला वाहकांना जबाबदार धरण्यात यावे.याबाबत एकाद्या महिलेने अथवा अपंगाने डेपो व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यास त्या वाहकावर कडक कारवाई व्हावी अशी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच चालकांना व वाहकांना तशा प्रकारचे सक्त आदेशसुध्दा देण्यात यावे अशी मागणी नागरीकाकडून होत आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहकाची आहे. परंतु, वाहक दिलेल्या जबाबदारीला बगल देत असल्याने महामंडळाचा उद्देश मातीमोल ठरत आहे. परिणामी, महामंडळाने आरक्षित केलेली जागा पत्रकार, महिला व अपंगांना मिळत नाही. मात्र, स्वत:साठी आरक्षित जागा तो कुणालाही देत नसल्याचे दिसून येते. सध्या लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड दिसून येते. बसस्थानकावर येताच प्रवासी जागा मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. या गर्दीत तरूण व्यक्ती स्वत:साठी तातडीने बसच्या खिडकीतून सिटवर रूमाल, शेला, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित करतात. मात्र,अपंग व महिलांना हे शक्य होत नाही. परिणामी,बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे महिलासह अपंगांनाही उभेच राहावे लागते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वाहकांना आरक्षित जागा संबंधितांना देण्यासाठी निर्देशित करावे, अशी मागणी नागरिकामधून होत आहे.

Web Title: Who is the reserved bus in the bus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.