‘कोण रामदास आठवले?, मी ओळखत नाही’
By Admin | Updated: May 30, 2017 03:47 IST2017-05-30T03:47:48+5:302017-05-30T03:47:48+5:30
काही जणांना मी खिजगणतीत धरत नाही. कोण रामदास आठवले? हू इज ही? मी त्यांना ओळखत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया

‘कोण रामदास आठवले?, मी ओळखत नाही’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : काही जणांना मी खिजगणतीत धरत नाही. कोण रामदास आठवले? हू इज ही? मी त्यांना ओळखत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
लोकुत्तरा बुद्धविहारातील कार्यक्रमास ते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली होती त्यांच्या या भूमिकेकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने आता गोठ्याप्रमाणेच खाटेचेही नियंत्रण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला.
दलित आता मार देण्याच्या मन:स्थितीत
सहारनपूर येथील दलितांवरील अत्याचाराचा निषेध करताना ते म्हणाले की या घटनेने सवर्णांनी बोध घ्यायला हवा.
दलितांमधील नवी पिढी आता मार खाण्याच्या नव्हे तर मार देण्याच्या मन:स्थितीत आहे. सवर्णांनी आता स्वत:ला बदलून घ्यायला हवे.