शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी कोण? मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 08:53 IST

या पदासाठी जवळपास १२ आजी-माजी आयएएस, आयपीसएस अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. विद्यमान मुख्य आयुक्त यूपीएस मदान यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला संपणार आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची या पदावर नियुक्ती केली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. माजी मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य आयुक्त राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे हेही स्पर्धेत असल्याचे म्हटले जाते. या पदासाठी जवळपास १२ आजी-माजी आयएएस, आयपीसएस अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत.

निवडणूक आयुक्त पदासाठीच्या नावाची शिफारस राज्य सरकार हे राज्यपालांकडे करते आणि राज्यपाल नियुक्ती करतात अशी पद्धत आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ३० जून २०२४ रोजी करण्यात आली होती. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत.

 

  • मनोज सौनिक आहेत महारेराचे अध्यक्ष- मुख्य सचिव पदावर येऊन दोन महिनेही व्हायचे असताना आता त्या निवडणूक आयुक्त होणार असल्याची आयएएस लॉबीमध्ये जोरदार चर्चा आहे. या पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हेही राज्याचे मुख्य सचिव होते. निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती १७ जुलै रोजी  महारेराच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. 

१० महिन्यांचा कार्यकाळ बाकी

  • सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिवपदाचा १० महिन्यांचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. निवडणूक आयुक्तपदी साधारणतः निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.
  • सध्याचे आयुक्त मदान हे राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणूनच नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर काहीच दिवसात ते आयुक्त झाले होते.
  • सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ जून २०२५ पर्यंत आहे. याचा अर्थ त्या आणखी १० महिने या पदावर राहू शकतात. हा १० महिन्यांचा कार्यकाळ सोडून पाच वर्षांसाठी निवडणूक आयुक्तपद त्या स्वीकारतील का हा प्रश्न आहे.  
  • तथापि, त्या निवडणूक आयुक्त झाल्या तर या पदावर येणाऱ्या त्या दुसऱ्या महिला असतील. या आधी नीला सत्यनारायण यांनी २००९ ते २०१४ दरम्यान हे पद भूषविले होेते.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा