शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोण संजय राऊत? अजित पवारांनंतर आता नारायण राणेंनीही विचारले, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:49 IST

आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर नारायण राणे यांनी कोण संजय राऊत, मी ओळखत नाही. कोणत्यातरी प्रतिष्ठित माणसाचे नाव घ्या, असे सांगत धुडकावून लावले आहे. 

संजय राऊतांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला मग काय झाले. भांडूपच्या कोणत्याही निवडणुकीत मी गेलोच नाही. निवडणुकीसाठी खर्च केला असे बोललो नाही. संजय राऊतच्या प्रश्नावर सांगलीला येऊन का उत्तर देऊ. इथे अनेक विषय आहेत. यामुळे मी राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही, असे राणे म्हणाले.

राज्यात येत्या काही दिवसांत राजकीय भूकंप होतील असे सारे नेते सांगत आहेत. यावर राणेंना विचारले असता, अदानी,  शरद पवार कसे काय राजकीय भूकंप करतील, तशी शक्यता राज्यात नाहीय. पाच वर्षे सरकार टिकेल एवढी क्षमता सरकारमध्ये आहे. संयुक्तपणे आमचे सरकार चांगल्या प्रकारे सुरु आहे, असे राणे म्हणाले.  राणे भांडूपमध्ये काय म्हणालेले... आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते. याविरोधात राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राणेंना नोटीस पाठविली होती. राणे यांनी पुराव्यानिशी हे दावे सिद्ध करावेत, असे यात म्हटले होते. राणे यांच्याकडून या नोटीशीला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे राऊत यांनी मुलुंडच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना