शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:09 IST

बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

ठाणे - कर्जत येथील चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी भगीरथ बियाणी यांच्या नावाचा उल्लेख केला. भगीरथ बियाणीनं आत्महत्या का केली? कुणामुळे केली? २००२ पासून बीडमध्ये जी खुनाची मालिका सुरू झाली त्यामागे कोण असा थेट सवाल आव्हाडांनी उपस्थित केल्यानं अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती, मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

कोण आहे भगीरथ बियाणी?

११ ऑक्टोबर २०२२ रोजी बीडमधील भाजपा पदाधिकारी भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. स्वत:जवळील बंदुकीने बियाणी यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

बियाणी यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या दाव्यामुळे आज पुन्हा ही घटना चर्चेत आली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड