शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:21 IST

अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता.

बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजितदादांचे पुत्र जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. बारामतीचा हा लेक आता फलटणचा जावई होणार असून येत्या १० एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे. जय आणि ऋतुजा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादापासून झाली आहे. जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि नात्याने आजोबा असलेल्या शरद पवारांची भेट घेतली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी जय आणि ऋतुजा यांना नवीन नात्याच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून जय आणि ऋतुजा यांचा फोटो शेअर केला. त्यानंतर जयचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली. आत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्याची गुडन्यूज सर्वांना दिली. जय आणि ऋतुजा यांनी पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी जात आजोबा आणि आजी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. 

कोण आहेत अजित पवारांची भावी सून?

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं ऋतुजा यांच्याशी लग्न होणार आहे. ऋतुजा यांचं पूर्ण नाव ऋतुजा पाटील असं आहे. त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मिडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून मागील काही वर्षापासून जय पवार आणि ऋतुजा यांच्यात ओळख झाली होती. त्याशिवाय ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांच्या सूनबाई आहेत. 

दरम्यान, जय पवार हे अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच चर्चेत आले होते. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता. जय पवार यांनाच बारामतीतून उभे केले जाणार अशीही बातमी माध्यमात झळकली होती. जय पवार यांनी दुबईत काही काळ व्यवसाय सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर जय पवार पक्षाच्या बैठकींना, प्रचाराला हजेरी लावू लागले होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे