देव तारी त्याला कोण मारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:44 IST2016-10-19T01:44:43+5:302016-10-19T01:44:43+5:30

रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या भांगरवाडी रेल्वे गेट क्र. ३२ जवळ रेल्वे ट्रॅकवर एक दोन दिवस वयाचे अर्भक दोन युवकांना मिळून आले.

Who drew him to God? | देव तारी त्याला कोण मारी?

देव तारी त्याला कोण मारी?


लोणावळा : रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या भांगरवाडी रेल्वे गेट क्र. ३२ जवळ रेल्वे ट्रॅकवर एक दोन दिवस वयाचे अर्भक दोन युवकांना मिळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देत ओळकाईवाडी येथील पद्मावती रुग्णालयात या नवजात बालकाला दाखल केले. आज सकाळी ६:३० वाजता हे अर्भक मिळून आले.
सुहास साबळे आणि तेजस राईलकर (दोघेही रा. भांगरवाडी, लोणावळा) हे दोन युवक सकाळी साडेसहाला रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जीममध्ये जात असताना त्यांना रेल्वे ट्रॅकवर हे अर्भक दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर अर्भक उचलले आणि दोनच मिनिटांत मालगाडी तेथून गेली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस उपनिरीक्षक समशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. ए. जाधव, के. डी. जाधव, यू. एल. कोंगे, महिला पोलीस कर्मचारी एन. एल.पाटील यांनी पदमवती रुग्णालयात जाऊन सदरचे बाळ ताब्यात घेतले आणि पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले.

Web Title: Who drew him to God?