कोण कोणासाठी संपत नसतो

By Admin | Updated: May 27, 2017 03:13 IST2017-05-27T03:13:46+5:302017-05-27T03:13:46+5:30

राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत

Who does not end up for whom | कोण कोणासाठी संपत नसतो

कोण कोणासाठी संपत नसतो

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत. व्यक्तीचे काम त्याला जिवंत ठेवते. त्यामुळे कोण कोणासाठी संपत नसतो! सरकारच्या कामाची दिशा शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात मला यश आले आहे, अशा खोचक शब्दात कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्युत्तर दिले.
ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ या अभियानादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढत आहे.
माझे नेतृत्व शेतकऱ्यांतून पुढे आलेले आहे. माझ्यामागे राजकीय वारसा नाही. केवळ शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. खासदार राजू शेट्टी यांनी, सदाभाऊ आमच्यासाठी संपलेला विषय आहे, असे वक्तव्य केले होते. सदाभाऊ पूर्वीचे राहिले नाहीत, असे खा. शेट्टी समर्थक बोलतात.

Web Title: Who does not end up for whom