किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

By Admin | Updated: July 14, 2014 23:54 IST2014-07-14T23:54:45+5:302014-07-14T23:54:45+5:30

पाच वर्षात ४,८0१ प्रस्ताव नामंजूर

White elephant destined for farmers' accident insurance plan | किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

वाशिम: अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्य़ात आलेली शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संकटकाळी शेतकर्‍यांना हुलकावणीच देत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. वर्ष २00९ ते २0१३ या कालावधीत, राज्यातील १५,१0५ पैकी केवळ १0,३0४ प्रस्ताव मंजूर झाल्याने, उर्वरित ४,८0१ शेतकरी कुटुंबांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी, राज्य शासनाने २00५-0६ मध्ये राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. पुढे या योजनेचे ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे नामकरण करण्य़ात आले. योजनेचे नाव बदलले असले तरी, त्यामधील गुंता मात्र कायम असल्याचा आरोप, मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे.
या विमा योजनेच्या हप्त्यांचा भार राज्य शासन उचलत आहे; मात्र विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकरी कुटुंबियांचा आकडा ह्यथांबता थांबेनाह्ण असेच वास्तव आहे. शासनाने २00९ मध्ये या विम्यापोटी ९ कोटी ५३ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले होते. त्या वर्षात एकूण २,७३९ प्रस्ताव भरपाईसाठी दाखल झाले होते.
त्यापैकी १,७२३ मंजूर झाले, तर उर्वरीत प्रस्ताव फेटाळल्या गेले. वर्ष २0१३ मध्ये २,९५३ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १,८५१ प्रस्ताव मंजूर, तर उर्वरीत १,१0२ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.

Web Title: White elephant destined for farmers' accident insurance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.