शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 16:05 IST

महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी गुरुवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राँष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. याशिवाय त्यांनी, छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले आहे.

शिंदे-फडणवीस का उपस्थित नव्हते? -अजित पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळची व्यक्ती अमोल काळे, यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अस्तीविसर्जनासाठी त्यांना (देवेंद्र फडणवीस) नाशिकला  जायचे होते. ते गेले दोन-तीन दिवस त्या दुःखात आहेत. याशिवाय, एकनाथ शिंदे यांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितले की, आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या उमेदवाराचे नाव ठरेल. आम्ही सर्वजण जाऊन तो फॉर्म भरणार आहोत. सर्वांनीच तो फॉर्म भरायला जायला हवे, असे काही मला वाटत नाही. ते म्हणाले हरकत नाही. महायुती तर बरोबर आहेच. त्यामुळे तुम्ही जाऊन फॉर्म भरला. तरी देखील बातम्या लावल्या. अरे... राष्ट्रवादीच होती... शिवसेने शिंदे गट नव्हता... भाजप नव्हता... मी जर त्यांना बोलावलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, ते दुःखात असताना, आपण चला-चला फॉर्म भरायला चला, असे म्हणणे मला योग्य वाटले नाही आणि निवडणूकही बिनविरोध होणार होती. कारण एकीकडे २०० मते होती आणि एकीकडे काही ७०-७५ मते होती. त्यामुळे आम्ही आपले गेलो."

"त्यावेळी, आमचे प्रमुख नेते फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि नरहरी झिरवाळ होते. कारण चार जणांनाच आत प्रवेश असतो. आता स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घेण्याची वेळ आहे. त्यावेळेत जर उमेदवाराने माघार घेतली नाही, तर त्या बिनविरोध आल्या असे समजायला हरकत नाही," असेही अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांच्यासंदर्भात काय म्हणाले अजित दादा - छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना अजित दादा म्हणाले, "भुजबळ नाराज आहेत, हे धादांत खोटं आहे. स्वतःभुजबळांनी सांगितलं की, मी नाराज नाही. प्रफुल्ल भाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही लोक, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील, जे आमचा फारच विचार करतात. त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या बातम्यांमध्ये तसूभरही तथ्य नाही. यासंदर्भातला (सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज) निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतला आहे आणि काल फॉर्म भरला." 

 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे