शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 08:24 IST

२०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत राज्यात आतापर्यंत  ६९ लाख २३ हजार १९९ इतके मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले...

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी २०० पेक्षा जास्त शासन निर्णय (जीआर) जारी केले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जर यातील कोणता शासन निर्णय जारी झाला असेल,   तर त्याची तपासणी करण्यात येईल, तसेच महायुतीच्या नेत्यांकडून भाषणात वापरण्यात येत असलेल्या ‘व्होट जिहाद’ या शब्दालाही तपासण्यात येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत राज्यात आतापर्यंत  ६९ लाख २३ हजार १९९ इतके मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने आमदार निधी वाटपासह इतर अनेक प्रशासकीय निर्णयांचे शासन आदेश मंगळवारी जारी केले. यातील कोणते जीआर कोणत्या वेळी जाहीर करण्यात आले, हे तपासून पाहू. तसेच, महायुतीच्या नेत्यांकडून ‘व्होट जिहाद’ हा शब्द भाषणात वापरण्यात येतो. यात धार्मिक प्रचार होत असल्याचा आरोप होतो. त्याबाबतही तपासून पाहू, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा शब्द वापरण्यात आला आहे का, हे तपासू असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. 

पिपाणी चिन्ह कायम - पिपाणी आणि तुतारी या चिन्हाबद्दल केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आधीच स्पष्ट केले आहे. - ही चिन्हे मतदान यंत्रावर बाजूबाजूला येतील का, हे आताच सांगता येत नाही. उमेदवारांच्या नावांच्या वर्णमालाक्रमानुसार ते ठरते, असे चोक्कलिंगम यांनी पत्रपरिषदेत सांगितले.  

१९ ऑक्टोबर पर्यंत करता येईल मतदार नावनोंदणी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी न केलेल्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीसाठी अर्ज करता येईल, असेही चोक्कलिंगम यांनी यावेळी जाहीर केले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024