कुठे नेऊन ठेवलेय मानधन माझे?
By Admin | Updated: November 19, 2014 05:09 IST2014-11-19T05:09:06+5:302014-11-19T05:09:06+5:30
कुठे नेऊन ठेवलेय मानधन माझे?’ अशा शब्दांत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सरकारला सवाल विचारला आहे

कुठे नेऊन ठेवलेय मानधन माझे?
मुंबई : ‘कुठे नेऊन ठेवलेय मानधन माझे?’ अशा शब्दांत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सरकारला सवाल विचारला आहे. मंगळवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आझाद मैदानात थाळीनाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुकीत ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ अशा शब्दांत भाजपाने जोरदार प्रचार केला होता. त्याचाच आधार घेत अंगणवाडी तार्इंनी हे उपरोधक स्लोगन करून घोषणाबाजी केली. आघाडी सरकारने मार्च महिन्यात सेविकांच्या मानधनात ९५० आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही होत नाही आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यांचे मानधनही मिळालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे संघटनेने सांगितले.