शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कहाँ गया उसे ढूँड़ो ! मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादीचे बस स्टॉप शोध अभियान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:58 IST

मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.   

ठाणे: मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.   

मुंब्रा-कौसा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर नियमितपणे टीएमटीची बससेवा सुरु करण्यात आली. मात्र, ही बससेवा सुरु झाल्यानंतरही येथील बसथांबे गायब झालेले आहेत. जे बसथांबे होते तेही आता दिसेनासे झाले आहेत. त्या निषेधार्थ  आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यदअली अश्रफ, ऋता आव्हाड, मिलींद पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शानू पठाण आणि शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी दुर्बीण घेऊन बसस्टॉप शोधण्याचा प्रयत्न केला. कौसा पोलीस चौकीपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी  शानू पठाण यांनी कहा गया उसे धुंडो,  असे गाणे गायले.  या आंदोलनात अनिता किणे, राजन किणे, सिराज डोंगरे, नदीरा सुर्मे, आशरीन राऊत, फरजाना शाकीर शेख, मेराज खान, जफर नोमानी, हसीना अजीज शेख, साजिया अन्सारी, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, सुलोचना पाटील, बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, जमिला खान आदी सहभागी होणार आहेत.    

या वेळी शानू पठाण यांनी, सुमारे साडेआठ हजार लोक दररोज टीएमटीने प्रवास करीत असतात. या आधी कौसा ते रेतीबंदर दरम्यान 30 थांबे होते. आता   मात्र बसथांबाच दिसत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. मुंब्य्रातील नगरसेवकांनी या संदर्भात महासभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी आणि प्रशासन मुंब्य्रातील नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करुन महासभेत आवाज दाबणाऱयांना आम्ही जनसभेत उत्तर देऊ; तसेच, बसथांबे उभारेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु ठेऊ,  असा इशारा शानू पठाण यांनी दिला 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे