कुठे हसू आणि कुठे आसू
By Admin | Updated: June 1, 2015 04:56 IST2015-06-01T04:56:18+5:302015-06-01T04:56:18+5:30
मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे आपणा सर्वांनाच वाटते. नेमकी हीच संधी म्हाडाने इच्छुकांना दिली; आणि इच्छुक पात्र अर्जदारांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लॉटरीच्या

कुठे हसू आणि कुठे आसू
मुंबई : मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे आपणा सर्वांनाच वाटते. नेमकी हीच संधी म्हाडाने इच्छुकांना दिली; आणि इच्छुक पात्र अर्जदारांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लॉटरीच्या निमित्ताने का होईना साकार झाले. आपल्याला हक्काचे
घर मुंबईत लागल्याचे पाहून उपस्थित विजेत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले; तर ही संधी हुकल्यानंतर नाराज उपस्थितांचे डोळे पाणावले.
म्हाडाच्या घराच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दाखल झालेल्या पात्र अर्जदारांच्या डोळ्यांदेखत आणि प्रेक्षकांमधील पंचांसह म्हाडा अधिकाऱ्यांच्या साक्षीने लॉटरीची प्रक्रिया पार पडली. प्रथमत: सायन, मुलुंड आणि गोरेगाव येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, लॉटरीत आपल्याला घर लागल्याचे पाहून अजयकुमार देडे, भास्कर सपकाळे, प्रभुराज भिलावेकर, प्रशांत मोरे, शशिकांत सावंत आणि विजय वागरे या विजेत्यांचे डोळे आनंदाने भरून आले. या विजेत्यांनी आपल्या मनोगतात आनंद व्यक्त करीत ज्यांना घर लागले नाही; अशांना पुढल्या वर्षीच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासह घराची आशा कायम ठेवण्याचे आवाहन केले. ३१ मे रोजी जाहीर झालेल्या म्हाडा सोडतीचा निकाल https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/mhadaApplication.do या संकेतस्थळावर पाहता येईल.