शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली गुडन्यूज, मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 08:52 IST

Deputy CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana 2100 Rupees: आईची काटकसर आणि पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते. याचा विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Deputy CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana 2100 Rupees: लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत असते. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. अद्यापही या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु, याची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे. 

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी आहे.  राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आला आहे. या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केले.

आईची काटकसर आणि पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते 

लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना २३२ नंबरचा चा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात २३२ जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान केले. माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. १५०० रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, १५०० रुपयांचे २१०० रुपये योग्यवेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

दरम्यान, माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्मभूमी सातारा आहे. सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतो. संपत्ती कमावली यापेक्षा माणसे किती कमवली हे मी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हते. फेसबुक लाइव्ह नाही तर फेस टू फेस काम करावे लागते, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: Eknath Shinde Announces ₹2100 Update for Sisters

Web Summary : DCM Eknath Shinde assured women that the Ladki Bahin Yojana's ₹1500 payment will increase to ₹2100 at the right time. He criticized previous administrations, emphasizing his commitment to action over empty promises during a campaign rally in Satara.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकारShiv Senaशिवसेना