पीएमपीचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी ?

By Admin | Updated: October 29, 2014 00:33 IST2014-10-29T00:33:19+5:302014-10-29T00:33:19+5:30

पुणो जेवढे वेगाने विकसित होत आहे तेवढय़ाच वेगाने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधोगतीकडे जात आहे.

When will the journey of the life of the PMP stop? | पीएमपीचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी ?

पीएमपीचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी ?

पुणो : पुणो जेवढे वेगाने विकसित होत आहे तेवढय़ाच वेगाने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधोगतीकडे जात आहे. लाखो प्रवाशी असतानाही पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसची स्थिती दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या बसमध्ये प्रवास करावो लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार, असा विचारणा प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली. आतार्पयत राजकारण्यांनी हा प्रश्न केवळ झुलत ठेवला, पण आता नवे खासदार आणि आमदार तरी हा प्रश्न सोडवतील का, की तेही डोळेझाक करतील, असा खोचक सवालही प्रवाशांनी विचारला आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून केवळ सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था आहे. लोकल असली तरी ती काही मोजक्याच भागांमधून जात असल्याने त्याचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे नागरिकांना पीएमपीवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्रवासी असतानाही पीएमपी संचालक मंडळ आणि प्रशासन वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात अपयशी ठरत आहेत. मात्र दररोज पीएमपीच्या बसमधून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने अनेक नागरिक नाईलाजाने बसचा वापर करीत आहेत. मूलभूत सोयीही मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पुणोकर प्रवाशांना पीएमपीबाबत काय वाटते याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविलेल्या बोलक्या प्रतिक्रीया.(प्रतिनिधी)
 
पहिल्या वेळेत बस मिळणो म्हणजे दिव्यच
कॉर्पोरेशनच्या आजूबाजूला अनेक महाविद्यालये असल्याने इथून बस पकडणा:या विद्याथ्र्याची संख्या खूप आहे. मात्र विद्याथ्र्यासाठी कोणत्याही सोयी-सुविधा पीएमपी देत नाही. बस खूप जुन्या असल्याने त्या कोठेही बंद पडतात. बसची संख्या कमी असल्याने खूप वेळाने दुसरी बस येते. यामुळे तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते.
- प्रमोद बोडके, विद्यार्थी 
 
पीएमपीचे सगळ्यात मोठे स्थानक असलेल्या पुणो कॉर्पोरेशन स्थानकावर प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी बसथांब्याच्या सुविधा आहेत तर काही ठिकाणी त्या नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहत राहावे लागते. बस आल्यानंतर अनेक प्रवाशांना ती कधीच पहिल्या वेळेत मिळत नाही. यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.
 
मी तळेगावहून कॉर्पोरशनला येतो. मात्र बसची फ्रिक्वेन्सी खूपच कमी असल्याने एकदा बस गेल्यानंतर किमान अर्धा तास तरी बस येत नाही. बस मिळाली तरी ती गर्दीने भरलेली असते. त्यामुळे बसायला जागा मिळत नाही. यामुळे अनेकदा त्रस होतो.
- निखिल मित्तल, खेळाडू
 
बस थांबा जिथे आहे तिथे बस कधीही थांबविली जात नाही. त्यामुळे बस कधी आली आणि गेली हे अनेकदा कळतच नाही. बस अनेकदा गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे बसमध्ये चढताच येत नाही. कोणत्याही स्थानकावर बसचे वेळापत्रक नाही. महिलांच्या जागांवर पुरूष बसलेले असतात. त्यामुळे अनेकदा बसमध्ये भांडणो होतात. 
- विठ्ठल नेवसे, नोकरदार
 
गेल्या 8 वर्षापासून वाघोली ते मनपा असा प्रवास करते. पण या मार्गावर बसची संख्या खूपच कमी आहे. संध्याकाळी तर बस मिळणो खूपच अवघड होते. बसमध्ये गर्दी असल्याने अनेकदा त्यात चढता येत नाही. अनेक गाडय़ांमध्ये सीटच गायब असतात. त्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागतो. वाहक-चालक प्रवाशांशी नीट बोलत नाहीत.
- स्नेहल वाघमारे 
 
अनेक बसचे वाहक-चालक प्रवाशांबरोबर अरेरावी करतात. बसमध्ये प्रवासी चढत असतानाच चालक बस पुढे नेतो. यामुळे प्रवासी पडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. एखादा छोटा अपघात झाला, की बसमध्ये असलेली प्रथमोपचार पेटी घेतली तर त्यात काहीच नसते. बसमध्ये खूप गर्दी असल्याने चोरी होण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे.
- समाधान भोसले, विद्यार्थी
 
डेक्कन बसस्थानक ठरतेय जीवघेणो
डेक्कन जिमखाना येथील बसस्थानकावर दररोज प्रवाशांची संख्या खूप आहे. मात्र हे स्थानक खूपच अरुंद असून, येणा:या बस ठरविलेल्या जागांवर थांबत नसल्याने प्रवाशांना पळत जाऊन बस पकडावी लागते. यामुळे इथे अनेक छोटे अपघात होत असतात. मात्र पीएमपी व पालिका प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.
 
मी दररोज सुतारवाडी ते डेक्कन असा प्रवास करते. मात्र या रस्त्यावर बसचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे अनेकदा स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागते. बस आली तरी ती कधीही स्टॉपला थांबत नाही. पुढे जाऊन थांबते. त्यामुळे धावत-पळत जाऊन बस पकडावी लागते. यामुळे माझा अपघात होताहोता वाचला.
- मंदा कांबळे
 
मी सामान्य नागरिक असून, माङया कुटुंबातील सर्व जण बसने प्रवास करतात. त्यामुळे समस्या दररोज येतात. बसच्या समस्यांबाबत मी पीएमपी कार्यालयात आणि पालिकेमध्ये अनेकदा तक्रारी नोंदविल्या. मात्र त्यावर काहीच होत नाही. बसचालक खूप बेशिस्त वागतात. त्यांना बोलायला गेले तरी ते अरेरावी करतात. बस स्टॉपवर थांबविल्या जात नसल्याने विद्याथ्र्याचे अपघात झाल्याचे मी पाहिले आहे. 
- सी. एच. मुळे, नोकरदार
 
दररोज घरातून लवकर निघूनही बस वेळेत येत नसल्याने महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. येणा:यांपैकी अनेक बस खूप जुन्या असून, त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या अनेकदा मधेच बंद पडतात. त्यामुळे आमचा बराच वेळ जातो. दुसरी बसही लवकर मिळत नाही.
- अविनाश गिरी, विद्यार्थी
 
कामानिमित्त मी अनेदा पिंपरीहून डेक्कनला येते. मात्र बस वेळेवर येत नसल्याचे चित्र दररोजचे आहे. बस मिळाली तरी बसमध्ये गर्दी असल्याने बसायला जागा नसते. ज्येष्ठांसाठी बसण्याच्या जागा असे बोर्ड केवळ दिखाव्यासाठी लावले गेले आहेत. तिथे बसलेले प्रवाशी उठत नाहीत. चालक-वाहकांना सांगण्याचा प्रयत्न केल्यास तेही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे उभे राहूनच प्रवास करावा लागतो.
- शोभा आवटे, ज्येष्ठ नागरिक
 
पुणो स्टेशन 
असुविधांचा स्टॉप
दररोज हजारो लोक बाहेर गावातून पुण्यात येतात. अनेकजण पुणो रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर बसमधून जाणो पसंत करतात. मात्र पुणो स्टेशन येथील बस स्टॉपला असुविधांनी घेरले आहे. प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा नसल्याने ते भर रस्त्यात उभे राहून बसची वाट पाहत असतात. यात अनेकदा छोटे अपघातही झाले आहेत. मात्र त्यानंतरही पीएमपी प्रशासनाला जाग आलेली नाही.
 
मी मूळचा सोलापूरचा आहे. पण कामानिमित्त अनेकदा पुण्यात येणो होते. मात्र येथील सार्वजनिक बस व्यवस्था खूपच वाईट आहे. त्यामुळे नाईलाजाने बसऐवजी खासगी वाहनांनी जावे लागते. इतर शहरांमध्ये सार्वजनिक बस या एसी आहेत. पुण्यात एसी बस तर सोडाच साध्या बसही चांगल्या नसून, त्या खिळखिळ्या झाल्या आहेत.
- अमितसिंह गायकवाड, व्यावसायिक
 
खिळखिळ्या बसने दररोज प्रवास करावा लागतो. यामुळे खूप भीती वाटते. पण पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गेल्या 3क् वर्षापासून मी पीएमपीच्या बसने प्रवास करीत आहे. अनेकदा बसचे अपघात झालेले मी पाहिले आहेत. अपघात झाल्यानंतरही त्या बस दुरुस्त न करता तशाच रस्त्यावर आणल्या जातात. यामुळे बसची स्थिती खूपच वाईट आहे. त्या कधीही धुतल्या जात नाहीत.  
- मिलिंद जाधव 
 
गेल्या 3 वर्षापासून मी बसचा प्रवास करतोय, पण कधीही एकाही बसमध्ये मला गर्दी नाही असे दिसलेले नाही. बसची फ्रिक्वेन्सी खूपच कमी असल्याने येणा:या बस गर्दीने भरून येतात. बसची अवस्था खूपच वाईट आहे. अनेक ठिकाणी बसस्टॉपच नाहीत.  थांब्यांवर बसविण्यात आलेले हे इलेक्ट्रॉनिक बोर्ड आता गायब झाले आहेत.                                        - योगेश निमकर, विद्यार्थी
 
मला महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज धनकवडी ते शनिपार असा प्रवास करावा लागतो. पण मला कधीही बस वेळेवर मिळत नाही. लेडिज स्पेशल बसचा फक्त गाजावाजा केला गेला. मात्र त्या बस कोठेही दिसत नाहीत.  बसस्थानकांवर पिण्याच्या पाण्याची साधी सोयही नाही.
- कोमल सोनवणो, विद्यार्थिनी
 
 मोडकळीस आलेल्या बसमध्ये बसून बसून पाठदुखीचा त्रस निर्माण झाला आहे. अनेक बसमध्ये तर बसण्यासाठी सीटच नसल्याचे चित्र आहे. महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर पुरुष बसलेले असतात. याबाबत वाहक-चालकांना सांगितले तर ते उत्तर देत नाहीत. यामुळे भांडणो होतात. - रोहिणी गायकवाड 
 
बसस्थानकांवर अनधिकृत पोस्टर्स, बोर्ड मोठय़ा प्रमाणात लावलेले आहेत. त्यामुळे ही स्थानके खराब झाली आहेत. मात्र याकडे पीएमपी प्रशासनाचे लक्षच नाही. अशा अनधिकृत बोर्डावर कारवाई करणो आवश्यक आहे. 
- विष्णू कणसे 
 
 कोणत्याही नियोजनाशिवाय बीआरटी सुरूकरण्यात आली आहे. बीआरटी स्थानके खूप अरूंद आहेत. बसमध्ये प्रथमोपचार पेटय़ा केवळ नावालाच लावण्यात आल्या आहेत. मात्र त्या रिकाम्याच असतात. त्यामुळे एखाद्याला लागल्यास थेट दवाखानाच गाठावा लागतो. कोणतेही प्रथमोपचार करता येत नाहीत.
- सारिका पाटील

 

Web Title: When will the journey of the life of the PMP stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.